महादेव जानकरांना हवाय ‘माण’च - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, June 23, 2019

महादेव जानकरांना हवाय ‘माण’च


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
.......................................
दहिवडी :  मला माण मतदारसंघ दिला नाही तर मी मुख्यमंत्र्यांकडून नागपूरची जागा मागून घेईन, असे पशुसंवधंन व दुग्धविकास मर्ंत्री महादेव जानकर यांनी शनिवारी माण येथील एका कार्यक्रमात बोलताना सांगितल्याने जानकर ‘माण’वर ठाम असल्याचे दिसत असून हा मतदारसंघ भाजपला मिळण्याची चिन्हे अवघड असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, आम्ही भाजपच्या नाही तर रासपच्या चिन्हावर लढणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
महाराष्ट्रातील पहिली शेळ्या-मेंढ्यांची छावणी माणदेशी प्रबोधनकार मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूतगिरणी पिंगळी बुद्रुक येथे आज जानकर यांच्याहस्ते सुरु झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेळी-र्मेढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब दोलताडे, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य रणजितसिंह देशमुख, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे विस्तारक बाळासाहेब खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. संदीप पोळ उपस्थित होते.
मंत्री जानकर म्हणाले, शेळ्या-मेंढ्या छावणीची तरतूद नव्हती. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेमुळे ती झाली. सध्याच्या सरकारमुळेच सातारा-पंढरपूर रस्ता चौपदरीकरण झाला असून म्हसवड, वडूज, दहिवडी येथील औद्योगिक वसाहतीला लवकरच मंजुरी मिळेल, माणला दुष्काळमुक्त करण्याचं काम आम्ही करत आहोत. त्यासाठी पैसे कमी पडू देणार नाही.

No comments:

Post a Comment