महाराणी येसूबाई आगमन त्रिशताब्दी होणार दणक्यात - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, June 25, 2019

महाराणी येसूबाई आगमन त्रिशताब्दी होणार दणक्यात



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
.......................................
सातारा :  महाराणी येसूबाई यांच्या सातारा आगमनाला येत्या 4 जुलै रोजी तीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. या त्रिशताब्दी निमित्त महाराणी येसूबाई राजधानी सातारा आगमन त्रिशताब्दी सोहळा समितीच्या वतीने सातारा शहरात 3 व 4  जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष  शिवाजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी चंद्रलेखाराजे भोसले कार्याध्यक्ष रवींद्र भारती झूटिंग, जयंत देशपांडे, कोषाध्यक्ष अमर बेंद्रे, सुहास पोरे, कार्यवाह योगेश सूर्यवंशी, अजिंक्य गुजर, उपाध्यक्ष राजू गोरे, सतीश ओातारी , लीना गोरे नगरसेवक धनंजय जांभळे मिलिंद काकडे, अ‍ॅड प्रशांत खामकर उपस्थित होते.
 शिवाजीराजे व झुटींग म्हणाले,  छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्यूनंतर राणी येसूबाई व छत्रपती शाहू हे मोगलांच्या ताब्यात होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छ. शाहू महाराजांची 1708 मध्ये सुटका झाली. त्यानंतर राणी येसूबाई इस 4 जुलै1719 ला मोगलांच्या कैदेतून  सुटका होऊन सातार्‍यात आल्या. या सुटकेला येत्या 4 जुलै रोजी तीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक प्रसंगाचा अभ्यास व्हावा  या निमित्ताने युवराज्ञी येसूबाई या विषयावर निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा कार्यकारी  समिती व श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
लेखाची शब्दमर्यादा आठशे ते हजार शब्द असून निबंध स्पर्धकांनी आपल्या नाव पत्ता मोबाइल नंबरसह 29 जूनपर्यंत नगर वाचनालय येथे आणून द्यावयाचे आहेत. ही स्पर्धा सर्वासाठी खुली असून पाच विजेत्यांना आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत. 3 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती संभाजी मालिकेत येसूबाईची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची प्रकट मुलाखत व स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार आहे. गुरूवारी 4 जुलै रोजी महाराणी येसूबाईच्या मूर्तीचे भव्य स्वागत सजवलेल्या रथातून त्यांची भव्य मिरवणूक लिंबखिंड येथून काढण्यात येणार आहे.
या मिरवणुकीचे दोनशे दुचाकी स्वारांच्या रॅलीने गांधी मैदान  येथे  आगमन होणार आहे. राजवाडा गांधी मैदान येथे महोत्सव समितीच्या स्वागत होणार असून येसूबाईच्या मूर्तीची मिरवणूक राजवाडा मोतीचौक, देवी चौक कमानी हौद , शेटे चौक ते मोती चौक मार्गे पुन्हा राजवाडा अशी निघणार आहे. मिरवणूकीमध्ये सनई चौघडा, घोडेस्वार, व पारंपारिक वेषातील रणरागिणी हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असणार आहे . या सोहळ्याला खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंह भोसले, व पेशव्यांचे वारस महेंद्र पेशवे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन रवींद्र झूटींग यांनी केले आहे

No comments:

Post a Comment