तालुकाप्रमुख निवडीवरून वादंग - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, June 25, 2019

तालुकाप्रमुख निवडीवरून वादंग



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
..................................................
फलटण : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा व शिवसेनेमध्ये जोरदार धुसफूस पाहायला मिळाली. मात्र, पुढे जात दोघांनीही दोन पावले मागे येत गळ्यात गळे घातले. या नंतर राज्यभर जोरदार मुसंडी मारीत तब्बल 41 जागा जिंकत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पानिपत केले. यामुळे भाजपा व शिवसेनेने आता अब की बार 220 पार असे म्हणत विधानसभा निवडणुकीत रान उठवायला सुरुवात केली असतानाच फलटण तालुक्यात मात्र शिवसेनेच्या पदाधिकारी निवडीवरून जोरदार वादंग माजले आहेत. सोशल मीडियावर तालुकाप्रमुखाच्या निवडीचा फोटो व्हायरल होताच या निवडीवरून फलटण शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या निवडीवरून सोशल मीडियात एकमेकांना जोरदार ट्रोल करण्यात येत असून नेमक्या या निवडी खर्‍या की खोट्या याबाबतची चर्चा रंगली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी, फलटण पूर्व भागातील तालुकाप्रमुख राहुल देशमुख यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांच्या जागी विकास नाळे यांची निवड झाल्याचे सांगून त्यांना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी पुष्पहार घालून निवड करण्यात आल्याचा असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. तर ही निवड झालीच नसल्याचे पश्चिम तालुकाप्रमुख स्वप्नील मुळीक यांनी सांगितले. ते म्हणाले, मी स्वतः कृष्णा खोरे विकास महामंडळ चे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांच्या बरोबर बोललो असून ही निवड झाली नाही. मुळीक यांनी अशी पोस्ट टाकताच या  पोस्ट वरून ट्रोलींग सुरु झाले आहे.  फलटण विधानसभा मतदारसंघ हा राखीव असून युती मध्ये ही जागा शिवसेनेकडे आहे. या मुळे सध्या या निवडीवरून सुरू असलेली चर्चा सेनेसाठी धोक्याचा ‘बाण’ ठरू शकते, अशी चर्चा असून वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment