सातारा शहरातील अंतर्गत वाहतुकीत बदल - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, June 21, 2019

सातारा शहरातील अंतर्गत वाहतुकीत बदल


            सातारा: सातारा शहरातील पोवईनाका येथे ग्रेड सेपरेटच्या कामामुळे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी महाराष्ट्र पोलीस अधीनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त अधिकारानुसार सातारा शहरातील अंतर्गत वाहतुकीत बदल खालीलप्रमाणे करण्यात आला आहे.
                सातारा शहरातील अलंकार हॉल ते कमानी हौद मार्गे मोतीचौक हा मार्ग पोवईनाक्याकडून मौतीचौकाकडे जाण्यास शाहुचौक ते मोतीचौक एकेरी वाहतुकीसाठी वापरण्यात येईल. मौतीचौक ते जुना मोटार स्टॅन्ड, शेटे चौक, आर.के. बॅटरी कॉर्नर पोलीस मुख्यालय (खालचा रस्ता) हा मार्ग मौतीचौक कडून पोवईनाक्याकडे येण्यास आर.के. बॅटरी कॉर्नर पोलीस मुख्यालयापर्यंत सर्व वाहनांकरीता एकेरी वाहतुकीसाठी वापरावा. केसरकर पेठ ते क्रा. लहुजी वस्ताद चौक येथून अलंकार हॉल, पोलीस करमणूक केंद्र बाजुस उजवीकडे वळण्यास बंदी राहील. एल.बी.एस. कॉलेज बाजुकडून पवार टॉवर बिल्डींग येथून शाहुचौक बाजुकडे जाणारे रोडवर डावीकडे वळण्यास बंदी राहील. एल.बी.एस. कॉलेज बाजुकडून पवार टॉवर बिल्डींग येथून शाहुचौक बाजुकडे जाणारे रोडवर डावीकडे वळण्यास बंदी राहील.
                कमानी हौद ते शेटेचौक हा रस्ता कमानी हौदकडून शेटे चौकाकडे जाण्यास एकेरी वाहतुकीसाठी वापरण्यात येईल व शेटे चौकातून शनिवार चौक बाजुस डावीकडे वळण्यास बंदी राहील. शनिवार चौक ते देवीचौक हा रस्ता शनिवार चौकाकडून देवीचौकाकडे येण्यास एकेरी वाहतुकीसाठी वापरण्यास येईल व कमानी हौद बाजुस डावीकडे वळण्यास बंदी राहील. मौतीचौक ते गोलबाग, राजवाडा हा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी वापरण्यात येईल. चांदणी चौक ते समर्थ मंदिर हा रस्ता अतिशय अरुंद असल्याने दोन जड वाहने एकाच वेळी त्या रस्त्यावरुन जाऊ शकत नाही म्हणून हा रस्ता एस.टी. बसेस वगळता जड वाहनांसाठी दोन्ही बाजूने प्रवेश बंद करण्यात येत आहे. राजधानी टॉवर्स समोर वनसाईड पार्किंग झोन तयार करण्यात आला आहे.
                वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर-शाहुचौक-अलंकार हॉल पोलीस करमणुक केंद्र ते मौतीचौक रस्त्यांवर सम विषम तारखांचे पार्किंग झोन तयार करण्यात आले आहे.मौतीचौक ते खनआळी-शनिवारचौक-पोलीस मुख्यालय रस्त्यांवर सम विष तारखांचे पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत. प्रिया व्हरायटी कॉर्नर ते मनाली हॉटेल रस्त्यांवर सम विषम तारखांचे पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत. नवीन आर.टी.ओ. ऑफीस चौक ते के.बी.पी कॉलेज जाणारे रस्त्यांवर सम विषम तारखांचे पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत.
                राजपथावरील कमानी हौद ते शिर्के शाळा जाणारे मार्गावर कमानी हौद येथील रस्ता अरुंद असल्याने सर्व वाहनांकरिता नो पार्किंग झोन तयार करण्यात आला आहे. शेनिवार पेठ न्यु इंग्लिश स्कूल शाळे जवळील सोन्या मारुती मंदिर पासून 100 मि. अंतरावर फोरव्हिलर नो पार्किंग झोन तसेच सोन्या मारुती मंदिर ते नवीन मराठी शाळा समोरील गेटपर्यंत सर्व वाहनांकरीता नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. साईबाबा मंरि चौक ते गोडोली पोलीस चौकी चौक रोडवर नो पार्कींग झोन तयार करण्यात आला आहे.
                जड व अतिजड मालवाहू वाहनांना सातारा शहरातील बोगदा परिसर, मोळाचा ओढा, वाढे फाटा, खेडफाटा, बॉम्बे रेस्टॉरंट, देगाव फाटा, शिवराज फाटा येथून सातारा शहरात सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच दुकानात माल उतरविण्याकरीता येणारे मालवाहू वाहनांना रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत रवानगी राहील.

No comments:

Post a Comment