श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, June 21, 2019

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल


सातारा:  श्री. संत ज्ञानेश्वर  महाराज पालखी  सोहळा दि. 2 जुलै ते 6 जुलै 2019 अखेर सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असून सदर पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात दि. दि. 2 जुलै ते 6 जुलै 2019 रोजी पाडेगाव, लोणंद यथे प्रवेश करणार असून त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन दि. 6 जुलै 2019 रोजी सोलापूर जिल्ह्यात जाणार आहे. सदरचा पालखी सोहळा हा निरा लोणंद फलटणमार्गे पंढरपूर रस्त्याने जाणार असल्याने तसेच पालखी सोहळयात लाखो भाविक सहभागी होणार असल्याने पालखी जाणारे मार्गावर कोणताही अपघात घडु नये अथवा अनुचीत प्रकार घडू नये याकरिता पोलीस अधिक्षक सातारा महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 34 प्रमाणे प्राप्त अधिकारान्वये पालखी सोहळयातील वाहनांखेरीज व अत्यावश्यक सेवेतील खेरीज करुन इतर सर्व वाहनांना निरा लोणंद पंढरपूर मार्गावर दि. 2 जुलै ते 6 जुलै 2019 या कालावधीत खाली नमुद केल्याप्रमाणे प्रवेश करण्यास मनाई मनाई  करण्यात आली आहे.
दि. 1 जुलै रोजी 6 ते 3 जुलै रोजी 10 पर्यत फलटण येथून निरा लोणंदकडे येणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून येणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पुण्याकडे शिरगाव घाटातून वळविण्यात येत आहे.
दि. 1 जुलै रोजी 7 वा पासून ते 2 जुलै रोजी 22 वा. पर्यंत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी  सोहळयातील येणारे वाहनाखेरीज इतर वाहनांना बंद करण्यात येत आहे.
दि. 1 जुलै रोजी 9 पासून ते 3 जुलै रोजीचे 13 पर्यंत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्की मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे.
दि. 2 जुलै रोजी 0 वा. ते दि. 4 जुलै रोजीचे 24 वा. पर्यंत फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.
दि. 5 जुलै रोजी 0 पासून ते दि. 6 जुलै रोजी 16 वा पर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.
दि. 5 जुलै रोजी 0 पासून ते 6 जुलै रोजी 16 वा. नातेपुते कडून पुणे बाजुकडे जाणारी वाहतूक बारामती पुल येथून बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.
दि. 5 जुलै रोजी 0 पासून ते दि. 6 जुलै रोजीचे 16वा. पर्यंत नातेपुतेकडून फलटण मार्गे साताराकडे जाणारी वाहतुक शिंगणापूर तिकाटणे दहिवडी-सातारा अशी वळविण्यात येत आहे. नातेपुते कडून पुण्याकडे जाणारी वाहतूक नातेपुते-दहिगाव-जांब-बारामती मार्गे पुण्योकडे वळविण्यात येत आहे.
 दि. 4 जुलै रोजी 0 पासून ते दि. 6 जुलै रोजीचे 14 पर्यंत नातेपुते-वाई-वाठारकडे जाणारी वाहतुक शिंगणापूर तिकाटण-शिंगणापूर-जावली-कोळकी-झिरपवाडी-विंचुर्णी-ढवळपाटी-वाठार फाटा मार्गे वळविण्यात येत आहे.
 दि. 5 जुलै रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून पुढील बरड येथील मुक्कामी सकाळी 6 वा. मार्गस्थ होणार आहे सदर वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणुन पालखीतील वाहने फलटण ते पंढरपूर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण-दहिवडी चौक-कोळकी शिंगणापूर तिकाटणे-वडले-पिंप्रद-बरड अशी वळविण्यात येत आहे.
पालखी सोहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळयातील वाहनाखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी मार्गाने ये-जा करतील याची इतर वाहनधारकांनी नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment