आमदार जयकुमार गोरेंना धडा शिकवण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, July 10, 2019

आमदार जयकुमार गोरेंना धडा शिकवण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
औंध :औंध येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. आघाडीचा निर्णय काहीही होवो मात्र लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतलेल्या आमदारांना धडा शिकवण्याचा निर्धार पदाधिकारी,
 कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
  औंध येथे माण-खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, सभापती कल्पना मोरे, शिवाजीराव सर्वगोड, संदीप मांडवे, सुभाष नरळे,डॉ. संदीप पोळ,बंडा गोडसे, प्रा अर्जूनभाऊ खाडे, नंदकुमार मोरे, आशाताई बरकडे,हणमंत शिंदे,कविता म्हेत्रे,कल्पना खाडे,एस.पी.देशमुख, राजेंद्र माने,सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दिपक नलवडे, नंदकुमार मोरे, रमेश पाटोळे,आण्णा काकडे, बाळासाहेब जाधव,
शशिकला देशमुख, मनोज पोळ,,बाळासाहेब चव्हाण, हिराचंद पवार,कैलास घाडगे,ज्ञानेश्वर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  घार्गे म्हणाले की मतदारसंघ निर्मिती पासून  माणकडे विधानसभेची उमेदवारी आहे. खटावने नेहमीच सहकार्य करून चांगले मतदान दिले आहे. मतदारसंघाबाबतीत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र विचारावर आधारित असलेली संघटना टिकली पाहिजे वाढली पाहिजे. त्यासाठी एकसंघ होऊन काम करु. केवळ पेपरबाजी करून दिशाभूल करणारे नेतृत्व बाजूला करायचे आहे. मांडणी चांगली केली तर परिवर्तन अटळ आहे.
     प्रभाकर देशमुख म्हणाले कि निवडणूक जवळ आली की आमदारांना शेती पाण्याची आठवण होते. पाण्याचे गाजर दाखवून जनतेला त्यांनी झुलवत ठेवले आहे. मात्र दुष्काळाच्या भीषण झळानी जनता हैराण झाली आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी स्वाभिमान जागृत ठेवून आमदारांना धडा शिकवला पाहिजे. 
गायत्रीदेवी म्हणाल्या सगळे जण एकत्र बसून सक्षम पर्याय उभा करुया.  राजकारणातील अप्रव्रुत्ती बाजूला करण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊया. पैशाच्या जीवावरच राजकारण मोडून काढण्यासाठी सर्वानी तयार रहावे. असे आवाहन त्यांनी केले.
 यावेळीकल्पना मोरे,संदिप मांडवे,डॉ. संदिप पोळ,नितीन बुरूंगले,डॉ. संतोष देशमुख,आण्णा काकडे, नंदकुमार मोरे, प्रा.बंडा गोडसे, एस.पी.देशमुख, कविता म्हेत्रे. बाळासाहेब जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
सबकुछ गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी.
आगामी निवडणुकीत श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी लक्ष घालून माण मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी  मागावा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार लवकरात लवकर जाहीर करावा व आमचे म्हणणे वरिष्ठांपर्यंत पोहचवावे अशी आग्रही मागणी माण खटाव तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्या भाषणांमध्ये केली .त्यामुळे याबैठकीत सबकुछ गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी
असेच चित्र पाहावयास मिळाले.

No comments:

Post a Comment