पार्टीला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचणाऱ्याना हद्दपार करा : डॉ दिलीपराव येळगावकर - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, July 14, 2019

पार्टीला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचणाऱ्याना हद्दपार करा : डॉ दिलीपराव येळगावकर

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वडूज :     चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करून भारतीय जनता पार्टीला  बदनाम करणाऱ्याचे षड्यंत्र रचणाऱ्याना  हद्दपार करा अशी  टीका माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर केली. तर त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यास विरोध करणारा ठराव आज करण्यात आला.
     आज वडूज येथील ओंकार मंगल कार्यलयात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका करत त्याना भाजप प्रवेश देण्यास विरोध केला.
     यावेळी भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई,  सचिन गुदगे, तालुकाध्यक्ष विकल्प शहा, बाळासाहेब खाडे, धीरज दवे, हणमंतराव देशमुख, उपनगराध्यक्षा किशोरी पाटील, नगरसेवक अनिल माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    डॉ येळगावकर पुढे म्हणाले     अनिल देसाई , रणजितसिंह देशमुख,  मामुशेठ विरकर, प्रभाकर घार्गे,प्रभाकर देशमुख, संदीप पोळ  असे आम्ही सर्वांनी ठरवले आहे ही घाणेरडी प्रवृत्ती माण खटाव मधून हद्दपार करायची आहे. आणि यासाठी काँग्रेसचे ही काहीजण आमच्यासोबत  आले असून आम्ही सर्व जण एकत्र आलो आहोत. दोन वर्षात पाणी आणले नाही तर राजीनामा देतो म्हणणारे गोरे हे त्यांचा दिलेला शब्द विसरले का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  तर गोरेना त्यांची जागा वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीवेळीच त्यांना दाखवून दिली आहे.
   अनिल देसाई म्हणाले आम्ही सर्व एका ठिकाणी व एकत्र काम करीत असल्याने आता आमदार हा भारतीय जनता पार्टीचाच असणार आहे. त्यामुळे आता अशा चुकीच्या प्रवृत्तीना या तालुक्यात थारा नाही.  भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रासप व इतर मित्र पक्षाने केलेल्या प्रयत्नामुळे रणजितसिंह निंबाळकर याना तालुक्यांतून ९६ हजार मते मिळाली आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीचा मोठा वाटा आहे. यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप पक्षाचा वापर करून लोकांची फसवणूक करणाऱ्यांना पक्षाने थारा देऊ नये असे वरिष्ठांच्या कानावर घालणार असल्याचे ते म्हणाले.
 डॉ पेठे म्हणाले आगामी विधानसभेला निष्ठावंताना डावलून आज, उद्या येणाऱ्यांना संधी दिली तर भाजपचे कार्यकर्ते हे वेगळा निर्णय घेऊन ऐनवेळी पक्षाच्या विरोधात काम करतील.  आलम मोदी म्हणाले विधान सभेच्या निवडणुकीसाठी  व्यासपीठावर असलेल्यापैकी कोणासही संधी भारतीय जनता पार्टीने द्यावी. यासाठी आम्ही सहमत आहोत.  यावेळी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment