सुरेश कोरडेंसह जनता अर्बन बँकेच्या संचालकांविरोधात गुन्हा - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, July 10, 2019

सुरेश कोरडेंसह जनता अर्बन बँकेच्या संचालकांविरोधात गुन्हा


महाबळेश्वर:
 महाबळेश्वर येथिल मुख्य बाजारपेठेतील मिळकतीचा खोटा दस्तऐवज बनवून फसवणूक केल्या प्रकरणी वाई येथिल नामांकित जनता अर्बन को ऑप बँकेच्या संस्थापक अध्यक्षांसह तत्का ली न१७ संचालकां विरोधात महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
महाबळेश्वर येथिल मिळकतधारक प्रकाश रामचंद्र वाघ यांच्या १३२, मरीपेठ महाबळेश्वर यांची सि.स.नं २६६ व २६६/२ ही मिळकत आहे. २०११ साली फिर्यादी प्रकाश वाघ यांना याच मिळकतीमधील मोकळ्या जागेमध्ये जनता अर्बन बँकेची शाखा काढावयाची असल्याचे सांगून बँक अधिकारी व संचालकांनी आपसात संगनमत करुन फिर्यादीच्या जागेचा खोटा दस्तवेज बनवून फिर्यादी यांची सुमारे ६५ लाख रुपयांची फसवणूक केली अशी तक्रार फिर्यादी प्रकाश वाघ याने जनता अर्बन बँकेचे चेअरमन सुरेश दिनकर कोरडे रा. शहाबाग फुलेनगर वाई, जगन्नाथ पांडूरंग कदम रा. पसरणी, कृष्णराव बळवंत फरांदे रा. ओझर्डे, खिअलकुमार मेघराज चावलानी रा. यशवंतनगर वाई, बाबा भगवान खरात रा. सिध्दनाथवाडी वाई, श्यामराव बाळकृष्ण बनकर रा.रविवार पेठ वाई, बळीराम हणमंत जगताप रा. उडतारे, विकास दत्तात्रय फरांदे रा. करंजेपेठ सातारा, भिमराव साधू पवार रा. खानापूर सौ. मंगला नंदकुमार जमदाडे रा. फुलेनगर, दत्तात्रय लक्ष्मण सपकाळ रा. केंजळ, सौ. विद्या दिनेश धुमाळ रा. प्राध्यापक कॅालनी वाई, शशिकांत रानु कोरडे रा. शहाबाग फुलेनगर वाई, प्रसाद नामदेव घाडगे रा. मधली आळी वाई, सागर सुरेश जमदाडे रा. शहाबाग फुलेनगर वाई, दिनेश पांडुरंग धुमाळ रा. प्राध्यापक कॅालनी सिध्दनाथवाडी वाई यांच्या विरोधात तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरुन भा.द.वि.सं कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४७१, ४७४, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे जनता अर्बन को ऑप बँकेच्या अध्यक्ष, संचालक व कर्मचाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. गुन्ह्याचा तपास मा.स.पो.नि. महेंद्रसिंग निंबाळकर व पो.ना. श्रीकांत कांबळे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment