Hot Posts

6/recent/ticker-posts

दुर्गादौडीत आडकाठी, रॉडने मारहाण महिलेवर गुन्हा


सत्य सह्याद्री/फलटण

दुर्गादौडीनिमित्त ग्रामप्रदक्षिणा आणि ध्वजपूजन सुरू असताना झालेल्या वादातून चौघांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना सांगवी (ता. फलटण) येथे घडली. धार्मिक भावना आणि महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचाही आरोप आहे. 

याप्रकरणी कलमा बशीर मुलाणी (रा. सांगवी) यांच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मयूर दत्तात्रय घोरपडे (वय ३४) यांनी फिर्याद दिली. २० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास राहुल सूर्यवंशी यांच्या घरासमोर ध्वजपूजन सुरू होते. त्यावेळी संशयिताने आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मयूर घोरपडे, श्राव्या भगत, गौरव कुंभार आणि अभिजीत सस्ते यांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments