Hot Posts

6/recent/ticker-posts

धोंडेवाडीत गोवंश कत्तलीचा संशय; ९.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

 
धोंडेवाडी, ता. खटाव : मायणी-धोंडेवाडी गावच्या शिवेवरील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश सदृश जनावरांची कत्तल केल्याचा संशयास्पद प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी जिवंत जनावरे, मृत वासरे आणि वाहनात गोमांस आढळून आले. पोलिसांनी जनावरे व इतर साहित्य असा अंदाजे ९ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, अज्ञात व्यक्तींविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री संजय गणपत साठे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले. घटनास्थळी दोन देशी खिलार गायी, दोन अन्य गायी, एक गीर जातीचा खोंड, तीन जर्सी गायी, मृत अवस्थेतील वासरे आणि टाटा दोस्त वाहनात गोमांस आढळल्याचे फिर्यादीत नमूद आहे. काही जनावरांना वाहनात कोंबून ठेवल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस अंमलदार संदीप खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हवालदार कदम यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सदगर पुढील तपास करीत आहेत.

संशयितांचा शोध सुरू

विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात चर्चा सुरू झाली आहे. घटनास्थळी आढळलेल्या जनावरांची स्थिती, गोमांसाचा स्रोत आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख याबाबत पोलीस तपास करीत आहेत. दोषींना शोधून कायद्यानुसार कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Post a Comment

0 Comments