Hot Posts

6/recent/ticker-posts

सराईत गुंडाच्या मॉडिफाय बुलेटला सातारा वाहतूक पोलिसांचा दणका!


नंबर प्लेट गायब, कर्णकर्कश सायलेन्सर; १०,९०० रुपयांचा दंड थकीत :वाहतूक विभागाची कारवाई

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

मॉडिफाय सायलेन्सर, नंबर प्लेट गायब, मागील सीट काढलेली आणि डोळ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या लखलखत्या लाईट्सचा वापर करून रस्त्यावर धावणाऱ्या सराईत गुंडाच्या बुलेटवर सातारा शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. आज सकाळी पेट्रोलिंगदरम्यान वाहतूक पोलिसांनी MH 12/MJ 2456 क्रमांकाची बुलेट ताब्यात घेऊन वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा केली.

नियमांची पायमल्ली; बुलेट थेट वाहतूक शाखेत!

वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या बुलेटवर मॉडिफाय सायलेन्सर, नंबर प्लेट नसणे, मागील सीट काढलेली असणे आणि डोळ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या लखलखत्या लाईट्सचा वापर असे प्रकार निदर्शनास आले आहेत. संबंधित बुलेट रविवार पेठ, सातारा येथील सराईत गुंड श्रेयस दशरथ जाधव याच्याकडून ताब्यात घेतल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

१० हजार ९०० रुपयांचा दंड थकीत!

विशेष म्हणजे, या बुलेटवर यापूर्वीच १० हजार ९०० रुपयांचा दंड प्रलंबित आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून दुचाकीत अनधिकृत फेरफार केल्याप्रकरणी आता वाहतूक शाखेकडून पुढील दंडात्मक कारवाई सुरू आहे. संबंधित बुलेट सध्या वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा आहे.

शहरातील रस्त्यांवर नियमभंग करणाऱ्यांना इशारा

वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करणे, नंबर प्लेटशिवाय वाहन चालवणे आणि इतर वाहनचालकांना त्रासदायक ठरणाऱ्या उपकरणांचा वापर करणे यामुळे वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्यास नियमभंग करणाऱ्यांना चाप बसू शकतो. सातारा शहरात अशा वाहनांवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments