सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण : कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण येथील मुख्य बाजारात रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या धान्य व कडधान्यांच्या लिलावात गव्हाची सर्वाधिक ३३८ क्विंटल आवक झाली. पिवळ्या मुगाला प्रति क्विंटल १५ हजार ते २० हजार रुपये असा दर नोंदवण्यात आला. बाजरी, मका आणि घेवड्याचीही मोठ्या प्रमाणावर आवक झाली.
बाजार समितीने जाहीर केलेल्या घाऊक बाजारभावानुसार, ज्वारीची ६० क्विंटल आवक झाली असून तिला प्रति क्विंटल ३ हजार ५०० ते १० हजार रुपये दर मिळाला. बाजरीची ३१८ क्विंटल आवक झाली असून दर ३ हजार ते ५ हजार १०० रुपये राहिला. गव्हाची ३३८ क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल ३ हजार ते ४ हजार ४०० रुपये भाव नोंदवण्यात आला.
हरभऱ्याची ७१ क्विंटल आवक झाली असून त्याला ६ हजार ते ८ हजार १०० रुपये दर मिळाला. मक्याची ३०० क्विंटल आवक झाली असून प्रति क्विंटल २ हजार ७०० ते ३ हजार रुपये भाव राहिला. खपलीची ७ क्विंटल आवक होऊन तिला ४ हजार ५०० ते ५ हजार ४५० रुपये दर मिळाला.
कडधान्यांच्या बाजारात उडदाची २३ क्विंटल आवक झाली. त्याला ७ हजार ते १० हजार रुपये दर मिळाला. हिरव्या मुगाची १० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल ७ हजार ते १० हजार रुपये भाव नोंदवण्यात आला. पिवळ्या मुगाला मात्र १५ हजार ते २० हजार रुपये असा सर्वाधिक नमूद केलेला दर मिळाला.
भाजीपाला वर्गातील घेवड्याची २७७ क्विंटल आवक झाली असून त्याला प्रति क्विंटल ७ हजार ते ९ हजार रुपये दर मिळाला.

0 Comments