सत्य सह्याद्री/सातारा
इसमाला मारू नका, असे म्हणून आडवत असताना हवालदाराच्या अंगावर धावून हाताने व काठीने मारहाण करत शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी उत्कर्ष रेपाळ, आदिती उत्कर्ष रेपाळ, आदित्य उत्कर्ष रेपाळ, अंकुर उत्कर्ष रेपाळ (रा. सदरबझार सातारा) या कुटुंबीयांसह तेजस खंडू लवटे (रा. खेड), आर्यन तुपे (रा. जुना आरटीओ चौक) व अन्य एक अनोळखी मुलगा अशा सातजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हवालदार अनिकेत यशवंत बनकर यांनी फिर्याद दिली. ही घटना दि. २७ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलच्या अपघात विभागासमोर घडली. सर्व संशयित व पोलीस कॉन्स्टेबल घार्गे (९६३) असे सर्वजण एका इसमास मारत असताना बनकर यांनी अटकाव केला. त्यानंतर ही घटना घडली. सहायक निरीक्षक बिले तपास करत आहेत.

0 Comments