Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटणमध्ये मुलावर आईचे सात लाखांचे दागिने चोरल्याचा गुन्हा!

 


भडकमकरनगरमधील तनिष्क रेसिडेन्सीतील घटना; कपाटातील दागिने गायब, आईच्या फिर्यादीवरून मुलगा दिनेशविरुद्ध गुन्हा दाखल

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

फलटण : फलटण शहरातील भडकमकरनगर परिसरातील तनिष्क रेसिडेन्सी येथे आईच्या कपाटात ठेवलेले सुमारे सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मुलाने संमतीशिवाय नेल्याची तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी मनिषा सुरेंद्र काळेबेरे यांच्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा दिनेश याच्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ते ११ ऑक्टोबरदरम्यान ही घटना घडल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. भडकमकरनगर येथील तनिष्क रेसिडेन्सीमधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत मनिषा काळेबेरे यांनी दागिने कपाटात ठेवले होते. नंतर हे दागिने आढळून न आल्याने कुटुंबात चौकशी करण्यात आली. त्यानंतर मुलगा दिनेश याच्यावर संशय व्यक्त करत त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

या तक्रारीनंतर फलटण शहर पोलिसांनी दिनेशविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत. दागिने नेण्यामागील नेमकी परिस्थिती आणि तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

0 Comments