Hot Posts

6/recent/ticker-posts

रायगडमधील गुन्ह्यातील तीन आरोपी तासवडे टोलनाक्यावर ताब्यात

 


पांढऱ्या रंगाच्या वेरना कारसह तळबीड पोलिसांची कारवाई

तळबीड / सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा करून कराडच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती तळबीड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तासवडे टोलनाक्यावर सापळा रचला. यावेळी पांढऱ्या रंगाची ह्युंदाई वेरना कार अडवून त्यातील तिघांना वाहनासह ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे निशांत बंडू पाटील (वय ३५, रा. खराळे, पो. काळुंद्रे, ता. शिराळा, जि. सांगली), अमर जयसिंग पाटील (वय ३६, रा. नांदगाव, ता. कराड, जि. सातारा) आणि संग्राम शिवाजी पाटील (वय ३३, रा. काले, ता. कराड, जि. सातारा) अशी आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली काडकर आणि कराड उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक सुभाष फडतरे, हवालदार राघू खाडे, योगेश भोसले, सचिन गुरव तसेच पोलीस अंमलदार अभय मोरे, प्रवीण गायकवाड आणि संजय मासाळ यांचा सहभाग होता.

Post a Comment

0 Comments