सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कराड: जयवंत शुगर, धावरवाडी (ता. कराड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीने ऊस दराच्या मागणीसाठी काटा बेमुदत बंद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला सामोरे जाताना कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली. संचालक मंडळाशी चर्चा करून येत्या तीन दिवसांत चालू गळीत हंगामातील पहिली उचल जाहीर करण्याचे ठोस लेखी आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
कारखाना प्रशासनाने यावेळी सांगितले की, गेल्या हंगामातही पहिली उचल जाहीर करण्याचा मान जयवंत शुगरने घेतला होता. शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देण्याची परंपरा यंदाही कायम ठेवून चांगला, उच्चांकी दर जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील. तोपर्यंत शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली.तसेच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांना एकत्र करून ऊस उत्पादकांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या व्यापक लढ्याला कारखाना प्रशासनानेही पाठिंबा दर्शविला.
या लढ्यामुळे केवळ ऊस उत्पादक शेतकरीच नव्हे, तर साखर कारखाने आणि या उद्योगावर उपजीविका करणाऱ्या सर्व घटकांना दीर्घकालीन लाभ होईल, अशी भूमिका प्रशासनाने मांडली.
आंदोलनात मिळालेले लेखी आश्वासन हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. मात्र, आश्वासनाची पूर्तता होऊन प्रत्यक्ष ऊसदर जाहीर होईपर्यंत संघटनेचे लक्ष कायम राहणार आहे, असे प्रदेश प्रवक्ते अनिल पवार व प्रमोदसिंह जगदाळे यांनी सांगितले.

0 Comments