सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पक्षीय बलाबलाचे चित्र स्पष्ट झाले असून, भाजपने ९ जागांसह सर्वाधिक जागांवर बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ८ जागा मिळविल्या असून, शिवसेनेला ४ जागांवर यश मिळाले आहे. या निकालामुळे जिल्हा बँकेतील राजकीय समीकरणे स्पष्ट झाली आहेत.
प्रसारित निकालाच्या माहितीनुसार, भाजपकडून ज्ञानदेव रांजणे, जयकुमार गोरे, चंद्रकांत जाधव आणि अर्जुन काळे हे विजयी झाले आहेत. तर रणजितिसंह नाईक निंबाळकर, सर्जेराव सावंत, अतुल भोसले, नंदकुमार मोरे आणि काका धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुपाली राजपुरे, अजय भोसले, उदयसिंह पाटील उंडाळकर, योगेश फडतरे आणि सुनील माने यांनी विजय मिळविला आहे. तर मकरंद पाटील, सुरेश वीर आणि ऋतुजा पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
शिवसेनेकडून शंभूराज देसाई, संजीवराज नाईकनिंबाळकर आणि दीपक प्रल्हाद चव्हाण विजयी झाले असून, मंगल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या निकालानुसार भाजप ९, राष्ट्रवादी काँग्रेस ८ आणि शिवसेना ४ असे एकूण २१ जागांचे पक्षीय बलाबल निश्चित झाले आहे.

0 Comments