राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीसाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याची अंमलबजावणी करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोपर्यंत कार्यपद्धती निश्चित होत नाही तोपर्यंत एक वर्षाची सूट कायम ठेवण्यात यावी, असा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच, सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत व्यवहार्य धोरण निश्चित करण्यासाठी सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून समिती गठित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खाद्यतेलातील भेसळ रोखण्यासोबतच ग्राहकांची सुरक्षितता आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या उपजीविकेचा समतोल राखण्यावर शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0 Comments