सैनिक स्कूल सातारा येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी शहरातील विविध भागांतून नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३४ अन्वये २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत काही मार्गांवर वाहतुकीस बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
या मार्गांवर वाहतूक बंद
२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक आणि बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते पोवई नाका या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. तसेच गोडोली नाका, साईबाबा मंदिर मार्गे जिल्हा परिषद चौकात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कनिष्क मंगल कार्यालयाच्या बाजूने जिल्हा परिषद चौकात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांनाही बंदी लागू राहणार आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
बॉम्बे रेस्टॉरंट बाजूने सातारा शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांनी अजंठा चौक, गोडोली नाका मार्गे पोवई नाका बाजूकडे जावे व याच मार्गाने बाहेर पडावे.
वाढे फाटा बाजूने शहरात येणाऱ्या वाहनांसाठी जुना आरटीओ चौक, पारंगे चौक, पोवई नाका हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
खेड चौक बाजूने शहरात प्रवेश करणारी वाहने सिव्हिल हॉस्पिटल, पोवई नाका मार्गे शहरात येतील व याच मार्गाने बाहेर जातील.
मोळाचा ओढा बाजूने शहरात येणाऱ्या वाहनांनी भुविकास चौक, एसटी स्टँड, पोवई नाका मार्गे शहरात प्रवेश करावा व बाहेर पडताना याच मार्गाचा वापर करावा.
या वाहतूक बदलातून रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने तसेच अन्य सरकारी वाहनांना वगळण्यात आले आहे. नागरिकांनी वाहतूक बदलांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘सूर्यकिरण’ टीमच्या हवाई कसरती पाहण्यासाठी साताऱ्यात मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने हे नियोजन केले आहे.

0 Comments