याबाबत समजलेल्या माहितीनुसार, स्वयम हा आकुर्डी (पुणे) येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. काल (सोमवारी ता.२३) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बाणेर येथून तो दुचाकीवरून जात असताना चारचाकी वाहनाने त्यास धडक दिली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अपघाताची रात्री माहिती समजल्यानंतर कुटूबियांनी पुण्याकडे धाव घेतली. आज सायंकाळी त्याचा मृतदेह येथे आणण्यात आला.रात्री शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वयमच्या अपघाती निधनाची माहिती समजताच बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. त्याचे महाविद्यालयीन मित्रही याठिकाणी आले होते. कुटूंबियांना व त्याच्या मित्रांना अश्रू अनावर झाले होते. तो 'यश' या नावाने परिचीत होता. येथील शिवगर्जना गणेशोत्सव मंडळाचा तो सक्रीय कार्यकर्ता होता. त्याच्या पश्चात आई,वडील,लहान बंधू असा परिवार आहे. येथील हर्ष एजन्सीजचे संचालक,प्रतिष्ठीत व्यापारी
सागर येवले यांचा तो मुलगा आहे.

0 Comments